भूमाफियांचा गॉड फादर झाला उपायुक्त दीपक सावंत ?
वसई विरार चा सत्यानाश करू नका
वसई /विरार … वसई विरार शहरातील प्रभाग एफ आणि प्रभाग जी मध्ये लक्ष्मी दर्शन घडवत भूमाफियांकडूनअंदाधुंद पद्धतीने अवैध बांधकाम जोरात सुरू असून यामुळे शहराचे 313 वाजण्याची वेळ आली आहे. संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष देऊन शहराचा होणारा सत्यानाश थांबवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना 2009 मध्ये झाली होती. तेव्हापासून महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावर कोणालाही आज पावतो अंकुश लावता आलेला नाही. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत डझनभर आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त आले आणि गेले. मात्र त्यांनीही आपला आर्थिक हेतू साध्य करून घेत शहराचा सत्यानाश होत असल्याचे आपल्या उघड्या डोळ्यांनी पहात शांत बसण्यात धन्यता मानली.
वसई विरार महानगरपालिकेत आयुक्त म्हणून आयएएस दर्जाचे अधिकारी येतात. सतीश लोखंडे यांच्यापासून ते डी गंगाधरन यांच्यापर्यंत आणि बी.जी. पवार यांच्यापासून ते अनिल पवार यांच्यापर्यंत आलेल्या आयुक्तांनी वसई विरार शहरात कोट्यावधींचा काळा पैसा कमावत शहराचा मात्र सत्यानाश केला. येथील महापालिकेत कितीही क** आयुक्त आला तरी त्यांच्यासोबत येथील भूमाफिया मित्रत्वाचे नाते जपत आर्थिक हित जोपासत आपला व्यवसाय जोमाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे . जैसा गुरु वैसा चेला या म्हणीप्रमाणे उपयुक्त दीपक सावंत तंतोतंत बसतात. त्यांच्याकडे सी यु सी विभाग प्रमुखाची जिम्मेदारी दिलेली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अवैध बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी हा विभाग निर्माण करण्यात आला आहे. जेणेकरून प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या गैरकारभारावर अंकुश लावला जाऊ शकेल. मात्र दीपक सावंत यांनी सी यु सी विभागाला वसुलीचा अड्डाच बनवला आहे. तिथे सहाय्यक आयुक्तांना लाच देऊन भूमाफिया आपले काम करून घेत होते आता तिथेच दीपक सावंत यांचाही ग्रीन सिग्नल घेणे अनिवार्य झाले आहे. त्याचा परिणाम शहरात अवैध बांधकामे नव्या जोमाने सुरू होण्यास झाला आहे.
वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या छत्रछायेखाली दीपक सावंत भूमाफियांचे गॉडफादर झाले आहेत. आणि त्यांना प्रभाग समिती जी चे निलेश म्हात्रे आणि प्रभाग समिती चे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे हे दोघे शहरात जिथे ही अवैध बांधकामे होत असतात तिथे जाऊन आर्थिक बोलणी करून त्यांच्या हिस्सा सावंत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात धन्यता मानत आहेत.
या सगळ्या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारी तातडीने लक्ष देऊन दीपक सावंत यांना निलंबित करण्याचे आदेश देतील का ? जेणेकरून वसई-विरार शहराचा सत्यानाश होणार नाही, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.